भूम (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद हायस्कूल भूम येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मिलेट न्यूट्रेटिव्ह चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी विज्ञान शिक्षक पायघन यु पी यांनी या चॉकलेट संबंधी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. मुलांनी चॉकलेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला. शासनाकडून तीन प्रकारचे चॉकलेट बार प्राप्त झाले आहेत. काही चॉकलेट आठ दिवस तर काही नऊ दिवस वाटप करण्यात येणार आहेत असे विभाग प्रमुख ए. टी. जोशी यांनी सांगितले.


 
Top