भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात पडणाऱ्या दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. भूम पंचायत समितीकडे 16 ग्रामपंचायतींनी पाणीटंचाई विभागकडे पंचायत समिती भूम अंतर्गत टँकरची मागणी केली आहे. त्यापैकी 07 ग्रामपंचायत ना मंजुरी मिळाली आहे.  यामध्ये वालवड 04, अंभी 02, गिरवली 02, सामनगाव 01, वाल्हा 01, दांडेगाव 01, सध्या या गावांमध्ये टँकर चालू आहे. तर उर्वरित 09 गावांचा प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाला असून लवकरात लवकर सादर प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदार भूम यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. तसेच या गावांचा हिवर्डा, आंद्रड, गोरमाळा- कृष्णापुर, पाटसांगवी, सोन्नेवाडी, पाखरूड, ज्योतिबाचीवाडी, भवानवाडी, नागेवाडी या ठिकाणचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत.  पाणी टंचाईच्या काळात लागणारे पाणी एका माणसाला प्रतिलिटर प्रमाणे 20 लिटर व मोठे जनावरांना 40 लिटर व लहान जनावरांना 30 लिटर पाणी टँकरद्वारे देण्यात येत आहे. तालुक्यामध्ये अधिग्रहण व टँकर मागणी वाढत आहे. येत्या काळामध्ये पाणीटंचाई तीव्र जाणवू लागली. त्याप्रमाणे प्रशासन त्या - त्या स्तरावर बोअरचे, विहीर, अधिग्रहणाचे काम चालू केले आहे.


पाणी टंचाई विभाग पंचायत समिती भूम अंतर्गत एकूण टँकर प्रस्ताव 16 त्यात मंजूर प्रस्ताव 07 सादर करावयाचे प्रस्ताव 09 आहे. उर्वरित 09 प्रस्ताव कार्यालयास प्राप्त असून लवकरात लवकर सदर प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदार भूम यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

ए.एम.भोगे कनिष्ठ सहाय्यक 


 
Top