परंडा (प्रतिनिधी)-बस चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या बस अपघातात तीन जण जखमी झाले. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास परंडा कुर्डूवाडी रस्त्यावर ही घटना घडली. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास परंडा - कुर्डूवाडी बस  (एमएच 14 बीटी 0793) आवारपिंपरी जवळ आली असता चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगत असलेले झाड तोडून शेतात गेली. बसचा पाटा तुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान परंडा आगाराच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.  


 
Top