भूम (प्रतिनिधी)-सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ संवर्गातील पदभरती अंतर्गत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड करण्यात आलेल्या 53 पदांच्या यादीत सर्वसाधारण प्रवर्गात डॉ. दत्तात्रय इंगोले यांची राज्यात 7 व्या क्रमांकाने निवड झाली आहे. 

डॉ.दत्तात्रय किसन इंगोले हे सध्या पशुधन विकास अधिकारी  पंचायत समिती भुम येथे कार्यरत आहेत. त्यांनी धुळे जिल्हात प्रथम नियुक्तीने साडे चार वर्षे सेवा देऊन भुम पंचायत समिती येथे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) या पदावर 31 ऑगस्ट 2020 रोजी बदलीने रुजू झाले. डॉ. इंगोले भुम येथे रुजू झाल्यापासून आजतागायत त्यांनी गाई, बैल, म्हशी, शेळ्या, वासरे, श्वान, घोडे, जंगली प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी अशा शेकडो विविध पशुधनावर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून पशुधनाचे जीव वाचवण्यात यशस्वी झाले आहेत. लम्पी चर्म रोगात उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्हा परिषदेमार्फत त्यांना लंपी योद्धा या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. सध्याच्या काळात उत्पादन खर्च वाढत असल्याने पशुपालक मेटा कुटिला आला आहे. परंतु बदलत्या काळात पशुपालकानी देखील आपल्या दुग्धव्यवसायात काळानुरूप बदल करून ग्राहकाच्या मागण्या लक्षात घेऊन केवळ दुधाची विक्री न करता त्यापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून त्यांची विक्री करावी असे आवाहन देखील डॉ. दत्तात्रय इंगोले यांनी पशुपालकांना केले आहे.


 
Top