धाराशिव (प्रतिनिधी)-आगामी काळात होणारे सण, उत्सव, निवडणुक, जयंतीच्या अनुषंगाने अनेक संघटना, मंडळे यांच्या मार्फेतीने तसेच स्वंयमस्फुर्तीने रस्त्यावरुन वाहनांची रॅली काढली जाते. अशा रॅल्यांचे आयोजन करण्यापुर्वी पोलीस ठाण्यात लेखी पत्र देवून त्यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. 

दि. 19.02.2024 रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्ताने रिक्षा रॅली व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, रॅली मार्गक्रमण करत असताना रस्ता अडवला जाणार नाही. पादचाऱ्यांना व इतर वाहनांची गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधीत रॅलीतील वाहन चालकांनी घ्यावी. तसेच वेग मर्यादेचे उल्लघंन करणे, वाहनाची धुह्राडी बदलुन, भोंगे, हॉर्न वाजवून व इतर काही  स्टंट  करुन गोधंळ माजवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधीतावर ध्वनीप्रदुषण कायदा, मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात येईल. असे आवाहन  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी रॅलीतील वाहन चालकांना केले आहे


 
Top