भूम (प्रतिनिधी)- तुमच्या मोबाईलवर पाठविलेल्या लिंकवर जाऊन पॅन कार्ड अपडेट करा अन्यथा बँक खाते बंद होईल अशी भीती अज्ञात भामट्याने फोन करून दाखविली. संबंधितांनी लिंक ओपन करताच खात्यातील दोन लाख 59 हजार साफ झाल्याची घटना दिड वर्षापुर्वी घडली. पण त्याचा गुन्हा मात्र दि. 10 फेब्रुवारी रोजी दाखल झाल्याने भूम पोलिसांसाठी हा संशोधनाचा विषय झालेला आहे.

या प्रकरणी भुम पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी  मिथुन सुभाष वाणी, वय 37 वर्षे, व्यवसाय नोकरी  कृषी पर्यवेक्षक कृषी कार्यालय भुम रा. शिवाजी नगर भुम, ता. भुम जि. धाराशिव मु.पो. खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर यांना  त्यांचे मोबाईल नंबरवर दि. 23.09.2022 रोजी 15.53 वा ते 16.30 वा. सु कृषी कार्यालय भुम येथे अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर टेक्स्ट केसेज पाठवून पॅनकार्ड अपडेट करा. नाही तर तुमचे बॅक खाते बंद पडेल असा मॅसेजद्वारे व्हीके लॅम्पएलके लिंक पाठवली. फिर्यादी यांनी नमुद लिंक ओपन करुन त्यावर पॅनकार्ड नंबर व जन्मतारीख अपडेट केले. असता त्यांनतर फिर्यादी यांना प्राप्त ओटीपी टाकलेने फिर्यादीचे एसबीआय बॅक खाते मधून 2 लाख 59 हजार 997 रूपये काढून घेवून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्याद मिथुन वाणी यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो. ठाणे येथे कलम 420, भा.दं.वि.सं. सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम 2008 कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top