तुळजापूर (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी येथील तेजेस संतोष बोबडे या मराठा युवकाने छञपती शिवाजी महाराज परिसरात आमरण उपोषण सोमवार दि. 12 फेब्रुवारी पासुन सुरु केले आहे.
आमरण उपोषण सुरु करण्यापुर्वी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मराठा आरक्षणाची काढलेल्या अधिसुचनेची महाराष्ट्र शासनाने अमंलबजावणी करावी यासाठी दि. 10 फेब्रवारी पासुन मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणास पाठींबा देण्यासाठी मी सोमवार दि. 12 फेब्रुवारी पासुन छञपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. तरी महाराष्ट्र सरकारने तात्काळ मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आमरण उपोषणकर्ते तेजस सतीश बोबडे यांनी निवेदन देवुन केली आहे.