सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वे सोलापुर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक श्री.एल. के. रणयेवले आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती कल्पना बनसोडे यांच्या देखरेखी खाली खऱ्या अर्थाने आरामदायी आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर विभागातील गाड्यामध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.

2023-24 या आर्थिक वर्षासाठी मध्य रेल्वे मुख्यालयाकडून सोलापूर विभागासाठी 26.72 कोटी रुपयांचे तिकीट तपासणीचे लक्ष देण्यात आले होते, आपली सर्वोत्तम कामगिरी करत असताना सोलापूर विभागाने हे लक्ष आर्थिक वर्षाखेरीस सुमारे दीड महिना शिल्लक असतानाच पूर्ण करून 30.75 कोटी रुपये इतके अधिकतम शुल्क जमा केले. सदरची रक्कम हि आर्थिक वर्षासाठी दिलेल्या लक्ष रकमेशी तुलना केली असता 15.11% इतकी जास्त आहे. 

सदरचे लक्ष पूर्ण करण्याकरिता चालू आर्थिक वर्षभरात 13 विशेष तपासण्या करण्यात आल्या , आणि त्यातून समोर आलेल्या 1351(विनातिकीट,अनियमित प्रवासी,राखीव नसलेले सामान इ.)प्रकरणातून 8.73 लाख इतकी दंडाची रक्कम जमा केली.

10 नोव्हेंबर 2023 रोजी सोलापूर तिकीट तपासणीच्या इतिहासात प्रथमच 26,14,985/- इतकी विक्रमी स्वरूपातील दंडाची रक्कम जमा केली. 

यावेळी रेल्वे प्रवाशांना वैध प्रवास तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले.  .शेवटच्या क्षणी आरक्षण सुविधा देण्यासाठी, चार्ट तयार झाल्यानंतर आणि ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या 30 मिनिटे आधी प्रवासी चालु आरक्षण सुविधेचा लाभ घेऊ शकतात. रांगेत उभे राहू नये म्हणून प्रवाशांना निवडक स्थानकांवर  (स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशिन्स) वरून तात्काळ अनारक्षित तिकिटांची सुविधा मिळू शकते.

त्रास मुक्त सेवा आणि सुविधा देण्यासाठी रेल्वेने सतत प्रयत्नशील असताना  मोबाइल अँप उपलब्ध करून दिले आहे .ज्यामध्ये प्रवासी पेपरलेस प्रवासाची तिकिटे, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट  मोबाइल अँप्लिकेशन द्वारे बुक करू शकतात आणि तिकीट मोबाइल ॲप्लिकेशनमध्येच वितरित केले जाईल जे की  आणि  प्लॅटफॉर्म वर लब्ध आहे. तिकिटाची हार्ड कॉपी न घेता प्रवासी प्रवास करू शकतात. जेव्हा जेव्हा तिकीट तपासणारा कर्मचारी तिकीट मागितले तेव्हा प्रवाशांनी अँप मधील  'शो तिकीट' पर्याय वापरावा.


 
Top