कळंब (प्रतिनिधी)-  वेळोवेळी  स्वराज्यावरील येणारी  संकटे सुख व दुःख अशा प्रसंग व घटनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले व पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी आपले प्राण पणाला लावून ते सांभाळले. हा त्याग, समर्पण, व शौर्याचा इतिहास आहे. जगण्याचा उद्देश कळण्यासाठी महामानवाचे जीवन कार्य वाचले पाहिजे असे विचार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते मधुकर पाटील कोल्हापूर यांनी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शिव सेवा तालीम संघ  शिवजयंती उत्सव समिती आयोजित व्याख्यानमालेतील छत्रपती शिवाजी महाराजांसारख जगावे छत्रपती संभाजी राजे लढावे या विषयावर पाचवे पुष्प गुंफित असताना व्यक्त केले.

मधुकर पाटील यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांना बरोबर घेतले.महिलांचे संरक्षण तसेच शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले शेतीला पाणी उपलब्ध व्हावे साठी बंधारे बांधले. सावकारी कर्जातून मुक्त केले या सर्वामुळे जीवाला जीव देणारे मावळे तयार झाले मातीसाठी शिका, संघर्ष करा हे शिवचरित्राने शिकविले छत्रपती संभाजी राजे फंद फितुरीने पकडले गेले. परंतु आपला बाणेदार पणा शेवटपर्यंत सोडला नाही. पुढे संभाजी महाराजांनंतर ही  32 वर्ष मावळे प्राण पणाला लावून लढले व शत्रूंचे मनसुभे धुळीला मिळवले. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराजाना संस्कार दिले यामुळे हा आदर्श इतिहास घडला आज डिजिटल युगात हे सर्व लुप्त होत आहे. संस्कारापासून तरुण पिढी दुर जात आहे असे सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सई काळे या विद्यार्थिनीने जिजाऊ वंदना गायन केली. याप्रसंगी व्याख्याते मधुकर पाटील यांचा व निमंत्रित प्रमुख पाहुणे विधीज्ञ सर्वश्री त्र्यंबकराव मनगिरे,दिगंबर गायकवाड, संदीप पवार ,प्रवीण  यादव, शकुंतला फाटक ,मंदार मुळीक, सचिन जाधवर, एस .वाय काळे ,बंडू कोळपे ,बी.एम. लोमटे ,विष्णू डोके ,मनोज चोंदे, श्याम आगलावे, संकेत कणसे  ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, शिवाजी गिड्डे यांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने शाल पुष्पगुच्छ वस्पृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आल. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार जयंती उत्सव समितीचे शिवाजी कदम ,प्रताप शिंदे ,नामदेव पौख संजय घुले, सुरेश शिंदे ,गोविंद चौधरी ,गणेश भवर ,राजाभाऊ गरड, सचिन शिंनगारे, बालाजी कापसे ,रोहित कापसे शिव खबाले ,प्रशांत देशमुख यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट, रमेश शिंदे यांनी केले.


 
Top