भूम (प्रतिनिधी)-महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील मानाचा गदिमा साहित्य पुरस्कार 2024  पाथरूड  येथील कवयित्री प्रा. अलका सपकाळ  यांच्यावादळ झेलताना या साहित्यकृतीस पुणे येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल येथील सभागृहात 31 व्या गदिमा काव्य महोत्सवात पद्मश्री गिरीश प्रभुणे ,कविवर्य फ.मु.शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

याप्रसंगी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईचे कल्याण आयुक्त मा.रविराज इळवे, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कविवर्य डॉ. जगदीश कदम, नारायण सुर्वे  साहित्यकला अकादमीचे अध्यक्ष मा.सुदाम मोरे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाराष्ट् पुणेच्या प्रमुख कार्यवाह मा. सुनिता राजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक एस.बी पाटील, कवयित्री संजीवनी तळेगावकर, बाल साहित्यिक शिवाजी चाळक साहित्यिक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अलका सपकाळ यांनी आपल्या साहित्यातून कष्टकरी उपेक्षित यांचे दुःख वेदना आपल्या लेखणीतून मांडले आहे. सामाजिक आत्माभान असलेल्या संवेदनशील कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात. भूम सारख्या ग्रामीण भागातल्या कवयित्रीस हा पुरस्कार  मिळाल्याबद्दल त्यांच्या  यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.


 
Top