धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकऱ्यांनी देशी गायी पालन करून आपली शेती व घर संसार समृद्ध करावा गायीमुळे आपल्याला भरपूर उत्पन्न मिळते त्यामुळे आपले कसल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होत नाही. तरीपण आपण कवडीमोल भावात आपल्या गाई कसायला विकतो असे विचार भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी मांडले. अनसुर्डा ता. धाराशिव येथील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने ग्राम परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी डोके यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले.
कोळगे पुढे बोलताना म्हणाले की गाईच्या पोटात आपण 33 कोटी देव आहेत असे म्हणतो. गाईचे गोमुत्र शेण काहीही वाया जात नाही. त्यामुळे मानवाच्या आरोग्यालाही शेती सोबत फायदा होतो. शेतकऱ्यांसह सर्वांनीच गाईसाठी आपलेपणा जपावा असे शेवटी कोळगे यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तथा धाराशिव पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब कदम, तुळजापूर विधानसभा विस्तारक पांडुरंग पवार, श्रीहरी माने, मधुकर माने, पांडुरंग माने, बालाजी पवार, काकासाहेब माने, गणपती माने, पांडुरंग डोके, अरविंद डोके सह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.