धाराशिव (प्रतिनिधी)-संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी, अव्वल कारकून कल्पना काशीद, बालिका चौरे तसेच कार्यालयातील विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.