परंडा (प्रतिनिधी) - गोरगरीब दलित यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा व समाजातील अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संत गाडगेबाबा ज्येष्ठ समाज सुधारक होते. असे मत प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करताना व्यक्त केले.

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात संत गाडगोबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रा. शंकर कुठे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे अनिल जानराव हिंगणगांव येथील एसपी वाघमारे, एमआयटी रेल्वे इंजिनिअरींग कॉलेज बार्शी येथील समीर बेग, प्रा. राजुरे, प्रा. नवले आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम माने, दत्ता आतकर यांनी सहकार्य केले.


 
Top