तुळजापूर (प्रतिनिधी)-  शहरातील घाटशिळ घाटातील  एस वळणाखाली एका अज्ञात महिलेचा झोपलेल्या  अवस्थेत मृतदेह शनिवार दि.17 फेब्रुवारी रोजी  सांयकाळी  आढळला आहे

सदरील  महिलेचा ओळख अधाप पटलेली नाही. शहरातील घाटशिळ घाटातील घाटशिळ कमान व एस वळणच्या मधील भागात झोपलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला आहे.सदरील महिलेचे वय चाळीस असुन  मृतदेहा शेजारी चप्पल असुन सदरील महिलेचा अंगात काळ्या पांढऱ्या रंगाच्या ठिपक्याचा गाऊन आहे. रंगाने काळी आहे.  सदरील महिला ही काही दिवसा पुर्वी शहरात वेड्या सारखी फिरत असल्याची चर्चा असुन पोलिसांनी सदरील महिलेचा मृतदेह शवविछेदनसाठी उपजिल्हारूग्णालय येथे ठेवण्यात आला आहे.


 
Top