तुळजापुर (प्रतिनिधी)- शहरातील घाटशिळ रोड वाहनतळाकडे जाणाऱ्या मार्गावर अनाधिकृत सात ते आठ गतिरोधक असुन हे अनाधिकृत गतिरोधक   तात्काळ हटविण्याची मागणी या भागातील ञस्त नागरिकांनी केले आहे.

नगरपरिषद अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, छञपती शिवाजी महाराज पुतळा ते पोलिस सकुंल मार्ग घाटशीळ रोड वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर  बेकायदेशीर रित्या  सात ते आठ  गतिरोधक करुन हे शहरवासीयांना व भाविक भक्तांना नाहक त्रास  देणारे आहे.  या बेकायदेशीररित्या गतिरोधक वर  भाविकांची अडवणुक करुन त्यांना खोटे आमिष दखवुन त्यांची आर्थीक लुट केली जात आहे. तसेच भाविकांना दारु पिऊन धुम्रपान करुन त्रास देत आहेत. तसेच अतिक्रमण करुन भाविक भक्तांना वाहतुकीस व स्थानिक देखील वाहतुकीस समस्या निर्माण केली आहे. तसेच मा.कोर्टाजवळ पासुन ते घाटशिळ रोड वाहनतळ मार्गावर असणाऱ्या गतिरोधक  वाहतुकीस कोंडी निर्माण करीत आहेत. या गतिरोधक ठिकाणी काही मंडळी भाविकंची वाहने अडवुन त्यांची लूट करीत आहेत. यात काही मद्यपीचा समावेश आहे. तरी हे बेकायदेशीर रित्या करण्यात आलेले गतिरोधक हे तात्काळ काढण्यात यावे अन्यथा उपोषण सारख्या मार्गाचा अवलंब करावे लागेल असे निवेदन स्थानिक विकी यल्लाप्पा मंडवळे, लक्ष्मण रंगनाथ पवार यांनी दिली आहे.


 
Top