तुळजापूर (प्रतिनिधी)-सोलापूर जिल्हयातील 6 शाळा व धाराशिव जिल्हयातील 4 शाळांतील 1200 विद्यार्थ्यांना गंमत ग्यान ॲक्टिव्हिटी बुक बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेडडी यांचे हस्ते दि. 17 फेब्रुवारी वाटप करण्यात आले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना बालाजी अमाईन्स व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी म्हणाले, गंमत ग्यान पुस्तकांमुळे मुलांचा वेळ मोबाईल वरचा कमी होईल. मुले या पुस्तकामधील खेळांमध्ये रमतील. या कारणाने त्यांच्या ज्ञानात भर पडेल. या मुलांचा विविध विषयांवर निरिक्षण व त्या वस्तूकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण व्हावा या करीता प्राथमिक शाळेतील मुलांना सध्या 1200 पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. यास मिळणारा प्रतिसाद व शिक्षकांचा फिडबॅक पाहून पुढील काळात जास्त पुस्तकांचे वाटप करण्याचा विचार आहे.

प्रारंभी बालक पालक गंमत ग्यान पुस्तकाबद्दल विनायक जोशी यांनी माहिती व शिक्षकांना पुस्तकातील 24 ॲक्टीिव्हीटी बद्दल माहिती दिली. सर फाऊंडेशनचे सिध्दाराम माशाळे यांनी हे पुस्तक मुलांना ज्ञान वाढीसाठी व मुलांना हसत खेळत कोडी सोडवत अभ्यास आहे. या प्रसंगी जि. प. प्राथमिक शाळा मजरेवाडी येथील राचेटी यांनी व प्राथमिक शाळा तामलवाडी येथील ज्ञानेश्वरी शिंदे यांनी आपले विचार व्यक्त  केले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना अशी पुस्तके मिळाल्यास व त्यांना अशा उपक्रमात सहभागी केल्यामुळे त्याचा त्या मुलांना फायदा होईल.

या कार्यकमास बालाजी अमाईन्सचे सी. एस. आर विभागप्रमुख मल्लिनाथ बिराजदार उपस्थित होते. तसेच शिक्षक बाळासाहेब वाघ, प्रकाश राचेटी, सिध्दाराम मशाळे, गुणवंत चव्हाण (पिंपळा खुर्द), ज्ञानेश्वरी शिंदे (तामलवाडी), वाघमारे (पिंपळा बु.), प्रक्षाळे, मोरेश्वर (शिंगडगाव), प्रतिमा जाधव (निंबगी), बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top