तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या नवीन कृषी धोरणा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना व बाजार समिती सहकारी संघ व्यापारी वतीने सोमवारी (ता. 26) रोजी  पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद मध्ये तुळजापूर  कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कर्मचारी, व्यापारी सहभागी झाल्याने आज कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यवहार शंभर टक्के बंद होते. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये प्रस्तावित केलेल्या सुधारणा केल्यास सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजार तळ, बाजार तळ, उपबाजार तळ निर्माण करणे, अडते, हमाल, मापाडी इत्यादी घटकांवर व बाजार समितीच्या उत्पन्नावर तसेच शेतकरी आवकेवर परिणाम होईल. बाजार समितीचे महत्व संपुष्टात येईल. या बाबी विचारात घेता महाराष्ट्र राज्य

बाजार समिती सहकारी संघानी दिलेल्या सूचनेनुसार सदर विधेयकाला विरोध दर्शविण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीने  सोमवारी (ता. 26) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. 

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा पाठींबा 

केंद्र सरकारच्या नवीन कृषी धोरणा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवार  दि.26  फेब्रुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यालाही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.बाजार समितीच्या निवडणुका न घेता कायम स्वरूपी प्रशासक नेमणार. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना स्थान नसेल.

सोयाबीनच्या दरात सातत्याने होत असलेली घसरण. यासाठी बंदचे आवाहन जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केले होते. त्याला व्यापारी वर्गाने मोठा प्रतिसाद दिला. आज कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय व दुकाने बंद होते. 
Top