परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे तालुकास्तरीय विविध  स्पर्धा घेण्यात आल्या व या स्पर्धाचे पारितोषिक वितरण येथील तहसीलदार घन:श्याम आडसूळ व नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर ,विस्तार अधिकारी सूर्यभान हाके, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी खालील एकूण 44 विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा आणि स्पर्धक असे - वक्तृत्व स्पर्धा जिल्हा परिषद शाळा लहान गट - प्रेम महेंद्र हावळे प्रा शा देवगाव खुर्द,  मोठा गट- आरक्षणा दत्ता शिंदे कन्या प्रशाला. खाजगी शाळा-कादंबरी श्रीराम नाईकवाडी कै रावसाहेब पाटील प्रा.वि. मोठा गट - सोनाली सुनील थोरात. कै रावसाहेब पाटील माध्य. वि.परांडा. कविता गायन-  जि प शाळा लहान गट - संध्या नितीन बनसोडे. कन्या प्राथमिक शाळा परंडा. मोठा गट - अनुजा ज्ञानेश्वर माळी कन्या प्रशाला. खाजगी शाळा लहान गट - राजनंदिनी धनंजय गायकवाड कै रावसाहेब पाटील प्रा वि परांडा. मोठा गट - स्वप्निल संतोष शिंदे ग्लोबल विद्यालय.  एकपात्री नाटक -जि प शाळा लहान गट - संध्या नितीन बनसोडे  कन्या प्रा शा. मोठा गट - माने विद्या सोमनाथ कन्या प्रशाला. खाजगी शाळा  लहान गट - विश्वदीप आनंद बनसोडे. कै रावसाहेब पाटील प्रा वि. मोठा गट - साक्षी नितीन गावडे ग्लोबल विद्यालय. निबंध स्पर्धा- जि प शाळा लहान गट - पौर्णिमा अतुल शिरसकर कन्या प्रा शा. मोठा गट - सुप्रिया कुमार बनसोडे कन्या प्रशाला. खाजगी शाळा मोठा गट - तेजस्विनी पांडुरंग सुरवसे.भैरवनाथ विद्यालय कंडारी. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा- जि प शाळा लहान गट - सुहाना विठ्ठल एडके. प्रा शा शिराळा. मोठा गट - फातिमा शरीफ कुरेशी  कन्या प्रशाला. खाजगी शाळा लहान गट - औदुंबर नितीन वाघमारे कै रावसाहेब पाटील प्रा वि. मोठा गट - दिपाली पांडुरंग घोगरे भैरवनाथ विद्यालय. वाद विवाद स्पर्धा - जि प शाळा लहान गट - सृष्टी नागनाथ दबडे प्रा शा शिराळा. मोठा गट - यश संपत काळे  प्रशाला मुले परांडा. खाजगी शाळा लहान गट - शिवानी राम जगताप ग्लोबल विद्यालय. मोठा गट - अमृता नानासाहेब डांगे भैरवनाथ विद्यालय कंडारी. प्रश्नमंजुषा स्पर्धा- लहान गट संयुक्त विजेते, के प्रा शा आनाळा, प्रा शा कुक्कडगाव, प्रा शा पाचपिंपळा. मोठा गट - जि प कन्या प्रशाला. खाजगी शाळा लहान गट - औदुंबर नितीन वाघमारे, साहिल इकबाल शेख. कै रावसाहेब पाटील प्रा. वि. मोठा गट - ग्लोबल विद्यालय पिंपरखेड  परंडा.या स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना  घनश्याम अडसूळ  तहसीलदार परंडा, पांडुरंग माढेकर नायब तहसीलदार, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यभान हाके ,स्पर्धा समन्वयक सदस्य, भाऊसाहेब सूर्यवंशी, बळीराम गंगणे, दिनकर पवार, शरद रामचंद्र इंगळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  

स्पर्धकांना पारितोषिक व पदक देऊन गौरविण्यात आले यावेळी नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर यांचे मराठी भाषा संवर्धन काळाची गरज व भाषेचे महत्व याविषयी व्याख्यान संपन्न झाले.पर्यवेक्षक म्हणुन काम करणाऱ्या शिक्षकांचा तहसीलदार घन :श्याम अडसूळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तालुका स्तरीय स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणुन खालील शिक्षकांनी काम केले. निबंध स्पर्धा दीपक काटकर प्रशाला सिरसाव, सतीश खरात प्रशाला परंडा, दिनकर साबळे गटशिक्षण कार्यालय परंडा, बाळासाहेब डोके गटशिक्षण कार्यालय परंडा, वक्तृत्व स्पर्धा मुरलीधर धारकर, बळीराम गंगणे, अमोल अंधारे कविता गायन, पल्लवी चव्हाण, आबासाहेब घावटे, शुभांगी देशमुख मीनाक्षी नकाते, एकपात्री नाटक संभाजी धनवे, संजीव मुसळे, प्रश्ण मंजुषा स्पर्धा शंकर अंकुश, सुनील महामुनी, सतीश शिंदे,सारीका हेगडकर, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा बाबासाहेब पाचकुडवे,विजयकुमार माळी , गणेश भाग्यवंत या शिक्षकांनी उत्कृष्ट पर्यवेक्षण व मूल्यमापन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सूर्यवंशी कन्या प्रशाला. परंडा यांनी केले सूत्रसंचालन बळीराम गंगणे रावसाहेब पाटील प्राथमिक शाळा परंडा यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब घोगरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामचंद्र इंगळे, दिनकर पवार, दिनकर माने, महादेव विटकर, बाबूधी घाडगे, तानाजी मिसाळ, नारायण शिंदे, चंद्रकांत सुरवसे, आबासाहेब माळी, मीनाक्षी मुंडे, गीता मंडलिक, रेखा उसराटे, शुभांगी देशमुख, सतीश खरात, भाऊसाहेब सुर्यवंशी. संतोष ओव्हाळ, दादासाहेब लांडगे यांनी परिश्रम घेतले.


 
Top