परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील अतितीव्र गरजू आवश्यक असणाऱ्या दिव्यांगासाठी समाज कल्याण विभाग जिल्हा शैल्य चिकित्सक धाराशिव व दिव्यांग उद्योग समूह यांच्या वतीने परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.
या शिबिरामध्ये 21 अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी करत असताना जिल्हा दिव्यांग तपासणी अधिकारी डॉ.भोरे यांचे सहकार्य लाभले.दिव्यांगाचा उद्धार हाच दिव्यांग उद्योग समूहाचा आधार याप्रमाणे कार्य करणारे सामाजिक संघटना होय. दिव्यांगाच्या वेळोवेळी अडीअडचणी समस्यावर उठाव करून दिव्यांगांना न्याय देण्यासाठी ही सामाजिक संघटना सतत कार्यरत असते. दिव्यांग तपासणी करताना दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके, शहराध्यक्ष गोरख देशमाने, आदिवासी तालुकाध्यक्ष सतीश पवार, डोंजा सर्कल संतोष कुलकर्णी, उत्तम शिंदे ,अशोक भराडे, प्रहार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे व मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव तसेच सरकारी रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.