भूम (प्रतिनिधी)- मागील अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची जीवन वहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टी च्या भूम आगारातील कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शुक्रवारी दुपारी शेकडो एस. टी. कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळाने संपर्क कार्यालयात भेट देऊन डॉ.राहुल घुले यांच्याशी फोनवरून चर्चा केली व पिण्याच्या पाण्याची मागणी केली. डॉ.राहुल घुले यांनी क्षणाचाही विलंब न करता उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन 24 तासात कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा टीम ला आदेश दिला. शनिवारी दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी गुरुवर्य भिमराव घुले व आगार प्रमुख लांडगे यांच्या हस्ते पिण्याच्या थंड पाण्याचे फीत कापून उदघाटन करून लोकार्पण केले.

डॉ.राहुल घुले यांच्या वतीने मागील अनेक महिन्यापासून भूम, परांडा, वाशी तालुक्यातील नागरिकांना मोफत ऑपरेशन, शेतकऱ्यांच्या जळालेल्या डीपी ची मोफत वाहतूक यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याचा अनेक गरजू नागरिकांना प्रत्यक्ष फायदा झालेला आहे. शनिवारी डॉ.राहुल घुले यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व कर्मचारी बांधवांनी त्यांचे आभार मानले. डॉ.राहुल घुले यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी आगारातील प्रदीप लोखंडे, मिलिंद वाघमारे, नामदेव नागरगोजे, सुदाम कवडे, वैभव हाराळ, गणेश वाघमारे, भारत साठे, गणेश गायकवाड, श्रीमती मांजरे, पवार यांच्यासह मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय शेंडगे, उपाध्यक्ष हरीश गाढवे व सर्व सदस्य उपस्थित होते.


वरिष्ठ स्तरावर वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा करून देखील सोय होत नव्हती. मात्र डॉ.राहुल घुले यांनी तात्काळ दखल घेऊन अवघ्या 24 तासात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.याचा सर्व कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

(दिपक लांडगे - आगार प्रमुख, भूम)


डॉ.राहुल घुले यांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करून खूप मोठा वाटा उचलला आहे,आमची अनेक दिवसांची चिंता मिटली आहे. (नामदेव नागरगोजे)


 
Top