भूम (प्रतिनिधी)- गेल्या 28 वर्षापासुन सुरु असलेला प्रभु विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रम आरसोली रोडवरील मंदीरात संपन्न झाला.

भूम येथील येथील आरसोली रोडवरील श्री प्रभु विश्वकर्मा जयंती निमित्त दि. 22 रोजी सकाळी श्री प्रभु विश्वकर्मा यांच्या मुर्तीस महाअभिषेक व महापुजा संपन्न झाली. सकाळी 10 ते 12 या वेळेत हभप भैय्या महाराज धारकर कासारी ता. भूम यांचे गुलालाचे किर्तन होवुन दुपारी 12 वाजता श्री प्रभु विश्वकर्मा जयंती सोहळा गोपाळकाला संपन्न झाला. यानंतर माजी नगराअध्यक्ष संयोगीता गाढवे यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

यानिमित्ताने गेल्या पाच दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमाची सुरवात कलश पुजनाने कार्यकारी अभियंता महावितरण नामदेव कानिफनाथ सुतार यांच्या हस्ते दि. 18 रोजी संपन्न झाले. दैनंनदिन पाच दिवस हभप भैय्या महाराज धारकर यांची रामकथा रात्री हरी जागर महिला भजन दि. 21 रोजी हभप गोकुळदास महाराज सुरवसे वाकवड यांचे किर्तन आदी कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी गेल्या पाच दिवसापासून भाविकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी श्री प्रभु विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज बांधवांनी विषेश परिश्रम घेतले.


 
Top