भूम (प्रतिनिधी)- छोटा व्यवसाय मोठे ध्येय गाठण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विनातारण, विना जामीन कर्ज दिले जाते. याचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा आणि आयुष्याची वाटचाल सुरू करावी, असे आवाहन भाजपचे भूम तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ धाराशिवच्यावतीने आयोजित जनजागृती मेळाव्यात बोलताना केले.

गुरुवार दि.22 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ धाराशिव यांच्यावतीने मध केंद्र योजनेतर्गत पंचायत समिती सभागृहात जनजागृती मेळावा घेण्यात आला. यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मिती, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर जावळीकर, कृषि विस्तार अधिकारी बी. व्ही. शिंदे, एसबीआय बँकेचे शाखाधिकारी तसेच विस्तार अधिकारी महेश बिडवे, जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी मध विभाग अधिकारी पी. के. पलवेचा,  स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या समन्वयक सीमा सय्यद मॅडम, कक्ष अधिकारी के. डी. मुंडे तसेच भाजपचे तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, पक्षाचे विश्वकर्मा योजना तालुका समन्वयक सचिन बारगजे,  शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर,  उद्योजक विनोद जोगदंड, तालुका प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर, चिटणीस लक्ष्मण भोरे यांच्यासह लाभधारक व बेरोजगार युवक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top