भूम (प्रतिनिधी)-गेल्या एक वर्षापासून सोनगिरी ता. भूम येथे चालू असलेल्या संत भगवान बाबा यांच्या मंदिराचे काम पुर्ण झाले आहे. या  मंदिराचा मुर्ती  प्रतिष्ठापणा व कलशरोहनाचा सोहळा दि. 29 फेब्रुरवारी होत असून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्धी प्रमुख भगवान बांगर यांनी केले आहे.

येथील ग्रामस्थांनी 45 लाख लोकवर्गणी जमा करुन गेल्या एक वर्षापासून या मंदीराचे काम सुरु होते. सोनगिरी सारख्या छोट्याशा गावात भव्य दिव्य मंदीर साकारले असून, या निमित्ताने दि. 26 रोजी हभप विष्णु महाराज अंतरकर यांचे किर्तन व सायंकाळी भगवाण बाबा यांच्या चरित्रावर शाहिर बंडु फराटे यांचे भारुड होणार आहे. दि 27 रोजी हभप योगेश महाराज फुंदे, दि, 28 रोजी हभप सुनिताताई आंधळे तर दि. 29 रोजी विठ्ठल महाराज शास्री यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काकडा आरती हरीकथा आदी कार्यक्रम सुरु राहणार आहेत. 29 रोजी सकाळी 10 वाजता दिंडी प्रदक्षणा होवुन न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्री यांच्या हस्ते मुर्ती प्रतिष्ठापणा व कलशरोहना सोहळा होणार आहे. यावेळी माजी मंत्री पंकजाताई मुंढे, कृषी मंत्री धनंजय मुंढे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर या निमित्ताने एकाच व्यासपिठावर प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सभामंडपाची तयारी जोरदार सुरु आहे. यासाठी समस्त सोनगिरी ग्रामस्त विशेष परिश्रम घेत आहेत.


 
Top