धाराशिव (प्रतिनिधी) - जशी नवी नवरी मी खुप कामाची आहे हे दाखवण्यासाठी केलेल्याच कामाचा पाडा वाचते तशीच धडपड करत असल्याची टिका भाजपा आमदारांवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.   

शहरातील सर्व्हिस रोडसाठी मंजुर 68 कोटीच्या कामाचे नागरीकांच्या हस्ते केलेल्या भुमीपुजन कार्यक्रमा ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, जेष्ट नेते नानासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, बाजार समीतीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर,सतिष सोमानी, पंकज पाटील, उपळ्याचे सरपंच सुरज घोगरे, मनोज पडवळ आदीसह या भागातील नागरीकांची उपस्थिती होती.  

डी मार्टनजीक सर्व्हिस रोड तसेच एक अंडरपास होण्यासाठी या भागातील जनतेची मागणी होती. या मागणीसाठी गेल्या पाच वर्षापासून शिवसेनेच्या नेत्यांनी पाठपुरावा केला. मात्र भुमिपुजनाचा सोहळा सत्ताधार्यांतनी उरकुन घेतला. यामुळे ज्यांनी यासाठी योगदान दिले अशा सर्वच लोकासह खासदार, आमदार व माजी नगराध्यक्ष यांचा यावेळी सत्कार केला. शिवाय स्थानिक नागरीकाच्या हस्ते त्याचे भुमिपुजन केले. आमदार कैलास पाटील म्हणाले की, शासकीय कार्यक्रमातही आता पक्षाचे झेंडे, बॅनरबाजी करुन जनतेच्या पैशाची लुट केली जात आहे. यापुढेही या कामाबाबत काही अडचण असल्यास आम्ही ते पुर्ण करु असे आश्वासन यावेळी आमदार पाटील यानी दिले. मकरंद राजेनिंबाळकर यांनी आपल्या खास शैलीत आमदार राणा पाटील यांच्याविरुध्द टिका केली. स्वत:च्या तत्कालीन मतदारसंघातील प्रश्न सोडवता आला नाही. पण प्रश्न सुटल्यावर श्रेय घेण्याची त्यांची धडपड हास्यास्पद नव्हे तर लज्जास्पद असल्याचे त्यानी म्हटले. जेष्ट नेते नानासाहेब पाटील यांनीही हे कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या खासदार, आमदार व माजी नगराध्यक्ष या तिघांचे अभिनंदन केले. सोमनाथ गुरव यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी व आभार पंकज पाटील यांनी मानले.


 
Top