भूम (प्रतिनिधी)-येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन दिनांक 21 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ . संयोगिता संजय गाढवे यांनी यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात किडनी डायलेसिस मशीन  देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होते. दीड महिन्याच्या आतच त्यांची ही मागणी आरोग्यमंत्री सावंत यांनी किडनी डायलिसिस मशीन  ग्रामीण रुग्णालयाला देऊन पूर्ण केले आहे. किडनी व डायलिसिस साठी भूम तालुक्यातील रुग्णांना बार्शी, धाराशिव, पुणे ,नगर या ठिकाणी जावे लागते परंतु भूम येथील ग्रामीण रुग्णालयात या मशीन आल्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये या मशीन चालू होऊन रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत असे यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नानासाहेब गोसावी यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, डॉ. कुटे, डॉ. सपकाळ, डॉ. भौरे, हाजी बाबा पटेल, लालू पवार आदी यावेळी उपस्थित होते.


 
Top