धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापुर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर (कंचेश्वर) इंडस्ट्रीज प्रा.लि, या कारखान्याचा गाळप हंगाम 2023-24 हा सहकार महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरु आहे. गाळप हंगामात कामावर असलेल्या ऊस तोडणी मजुर व कारखाना कर्मचायांकरीता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहाय्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगरुळ व कारखान्याचे संयुक्त विद्यमानाने एन.टी.पी.ई अंतर्गत मोफत क्षयरोग स्क्रीनींग व आरोग्य तपासणी शिबीर शुक्रवारी (दि.23) कारखाना स्थळावर आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल 204 जणांनी लाभ घेतला.

तालुक्यातील मांजरा शुगर (कंचेश्वर) इंडस्ट्रीज कारखान्याचा गाळप हंगाम जोमात सुरु आहे. चालू हंगामात काम करणाया ऊस तोडणी मजुर व कारखान्यात काम करणाया कर्मचान्यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग घेवुन विविध प्रकारची तपासणी करुन घेतली आहे. यात 204 व्यक्तींनी याचा लाभ घेवुन शिबिरास उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व त्यांचा स्टाफ यांनी लाभार्थ्याची विविध प्रकारची तपासणी करुन प्रथोमपचारासाठी त्यांचेमार्फत औषधे वाटप केले आहे. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक सतीश वाकडे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. यात्नाळकर, डॉ. माळी, डॉ. पाठक, डॉ. आरडे, डॉ. जाधव व त्यांचे स्टाफचा सत्कार केला. शिबिराचे आयोजन प्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापक यांनी शिबिराच्या माध्यमातून मानवसेवा होत असुन आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी कारखान्याचे अजित कदम, जनरल मॅनेजर (टेक्नी.),  रामानंद कदम, जनरल मॅनेजर (ॲग्री), सुंदर साळुंके, चिफ केमिस्ट, उत्तम व्हायकर, डिस्टीलरी मॅनेजर, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व ऊस तोडणी मजुर, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top