परंडा (प्रतिनिधी) - श्री सद्गुरू कृपा महिला मंडळ परंडा या महिला मंडळांनी धर्मनाथ बीज उत्सव श्री गणेश जयंती उत्सव निमित्त विश्वकर्मी राज्यस्तरीय चारदिवसीय भजन स्पर्धा मौजे गाडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सद्गुरू कृपा महिला मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. या पारितोषीकाने परंडा तालुक्याचे नाव नावलौकिक केले आहे. या पारितोषिकाचे वितरण श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे अध्यक्ष सुनील रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  

या मंडळाला भजनाचे मार्गदर्शन हभप. संगीत विशारद शहाजी, आजिनाथ सुतार महाराज यांचे लाभले आहे. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा गायत्री दिनेश तिवारी, सौ सुलक्षणा सुनील शिंदे, शहाजी सुतार, प्रज्ञा काळे, सुलोचना मुसळे, सुमन दिवाने, कमल जाधव, कल्पना मस्के, सौ सुजाता पाटील, रेखा जमदाडे, दैवशाला शिंदे, सुमन कोकाटे आणि गोरे काकू यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या महिला मंडळामध्ये तबला वादक म्हणून हनुमंत वेताळ सोनगिरी यांचे सहकार्य लाभले. यावेळी सुनील शिंदे यांनी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. त्यांचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गायत्री दिनेश तिवारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुलक्षणा सुनील शिंदे यांनी केले. तर आभार प्रज्ञा काळे यांनी मानले.


 
Top