तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळी ब्रु  येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींना जन्मठेपीची शिक्षा जिल्हा सञ न्यायाधीश अंजू एस शेंडे  यांनी गुरुवार दि. 2 जानेवारी रोजी सुनावली. 

या बाबतीत अधिक माहीती अशी की , फिर्यादीने दिनांक 03.07.2020 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे फिर्याद दिली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे 1 सुरेश उर्फ सुर्याजी विश्वनाथ यादव 2. संभाजी सुर्याजी यादव 3. चंद्रकला सुर्याजी यादव, सर्व रा. आरळी बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दिनांक 02.07.2020 रोजी रात्री 06.00 वा.सु. शेत गट नं. 355 चे शेताचा सामाईक बांध टोकरला म्हणुन रमेश विठ्ठल यादव हा आरोपींना बांध का टोकरला असे विचारण्यासाठी त्यांच्याकडे गट नं. 63 मध्ये गेला असता सदर गुन्हयातील तिन्ही आरोपींनी मिळुन लोखंडी खो-याने डोक्यात, पायावर व हातावर मारहाण केली. तेंव्हा रमेश चा मुलगा व चुलते गोविंद यादव यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला व रमेश च्या मुलाने चुलते गणेश यादव यांना बोलावुन आणले तेव्हा सदरील तिन्ही आरोपींनी गणेश यादवलापण पकडुन खो-याने डोक्यात हाता-पायावर मारून गंभीर जखमी केले. सदरील मारहाणीमध्ये रमेश व गणेश यांचे डोक्याची कवटी फुटून मेंदू बाहेर पडला त्यामुळे जागीच मृत पावले. सदरील घटनेची माहिती पोलीसांना समजताच नळदुर्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, जप्ती पंचनामा तयार केला व दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, अणदूर येथे पाठविण्यात आले होते व तेथुन जळकोट येथे शवविच्छेदन करण्यात आले. प्रकरणाची तक्रार मयताचे भाउ महेश गोविंद यादव यांनी पोलीस स्टेशनला दिनांक 03.07.2020 रोजी हजर होवुन दिली. सदरील प्रकरणात मे. न्यायालयाने आरोपी विरुध्द भा.दं.वि कलम 302, 307 सह 34 अन्वये दोषारोप ठेवला तसेच सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस सिध्द करण्याच्या अनुषंगाने एकुण 13 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. सदरील प्रकरणात श्रीमती. अंजू एस. शेंडे मॅडम, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धाराशिव यांनी प्रकरणातील सरकार पक्षाचा पुरावा, घटनास्थळ पंचनामा, वैद्यकिय पुरावा व तपासी अधिकारी यांनी पुरावे कामी घटनास्थळाची तयार करण्यात आलेली सी.डी. असे सर्व पुरावे विचारात घेवुन आरोपींविरूध्द सबळ पुरावे उपलब्ध झाल्याने तिन्ही आरोपींना जन्मठेप व 5000 रू. दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदरील प्रकरणात सदरकार पक्षाच्यावतीने पंडीत के. जाधव अति.सरकारी अभियोक्ता, धाराशिव यांनी काम पाहीले तसेच तपासी अधिकारी जगदीश एन. राउत यांनी सदरील घटनेचा दोषारोप दाखल केला होता तसेच पी.एस.आय. राजेंद्र म्हेत्रे यांनी कोर्ट पेहरविचे कामकाज पाहिले.


 
Top