परंडा (प्रतिनिधी) - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वधर्मिय व सकल मराठा समाज परंडा तालुका यांच्या वतीने परंडा शहरात भव्य - दिव्य पारंपारिक मिरवणूक सोहळा शनिवार  (दि.24 ) उत्साहात झाला.जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय घोषाने व पारंपारिक वाद्य टाळ मृदंगाने परंडा नगरी दुमदुमली जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्नीक प्रतिमा पुजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मिरवणूकीत सहभागी होऊन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे,जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, राष्ट्रवादीचे ( श.प.गट ) प्रतापसिंह पाटील यांनी ढोल वाजवून जल्लोष केला. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, तहसिलदार घनश्याम आडसूळ, ॲड.सुभाषराव मोरे, पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, माजी सभापती गौतम लेटके, राष्ट्रवादी (अ.प.गट ) विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, उद्योजक रामभाऊ पवार आदि उपस्थित होते.पालखीतून मिरवणूक, पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारोंच्या संख्येने शिवभक्त, नागरिक सहभागी झाले होते.

हा देखना सोहळा पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हालकी,ढोल पथक, झांज,दांड पट्टा,सनई वाद्य, लेझीम पथक, तलवार बाजी, पोतराज,गोंधळी, तुतारी वादक ,वासुदेव,वारकरी,धनगरी ओव्या,सनई चौघडा, लाठी-काठी, उंट घोडे, मावळे अशा देखणा सोहळयाने शहरात शिवकालीन संस्कृती व परंपरेचे दर्शन झाले ! मिरवणूक शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाला.शासकीय विश्रामगृह , गोल्डन चौक, टिपू सुलतान चौक, आठवडी बाजार,परंडा किल्ला,मंडई पेठ, भवानी शंकर मंदिर,महाराणा प्रताप चौक ,बावची चौक या मार्गावरून हि मिरवणूक मार्गस्थ होऊन मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाली.


 
Top