धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर येथील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सतिश कदम यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. त्यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज  यांनी निर्माण केलेल्या रयतेचे राज्याचे वर्णन केले.  आपल्या व्याख्यानात थेवेन या इतिहासकाराने केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णनाचे संदर्भाने महटले की  जग जिंकण्याचे कर्तृत्व असणारे व्यक्तिमत्व होते. एल्फिन्स्टन, माजी गव्हर्नरने म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असता तर इंग्रजांनी जगावर नव्हे तर चंद्रावरही राज्य केले असते. तानाजी मालुसरे,  बहिर्जी नाईक, जीवा महाले यांचे सारखे निष्ठावंत व कुशल लढवय्ये सवंगडी मिळाल्या मुळे त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. पन्हाळा जवळील नेबापूर येथील शिवा काशिद यांनी शिवाजी महाराजांसारखे वेषांतर करुन पन्हाळ गडावरून सिद्धी जौहर च्या वेढ्यातून शिवाजी  महाराजांची  सुटका करण्याचे काम धाडसाने केले. आग्रा येथील  कैदेतून युक्तीने त्यांनी स्वतःची व सर्व सहकार्यांची सुटका केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनामधील अनेक प्रसंगांमधून प्रेरणा घेतल्यास आपले जीवन यशस्वी व आनंदी होऊ शकते. महाराजांनी रयतेला मुघलांच्या गुलामगिरीतून  मुक्त केले. शेतकर्यांना मदत केली. कृषी नियोजन केले.   त्यांनी स्पष्ट केले की शिवचरित्रातुन अनेक गोष्टी शिकता येतात. चांगल आयुष्य कस जगाव हे आपल्याला मार्गदर्शन होते. शेती व्यवस्थापन आपण समजून घेतले पाहिजे. स्त्री संरक्षण व आदर असणारे राज्य होते.  नखाते संपदा या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे 'न्यायाचे व समतेचे राज्य' या विषयावर भाषण केले. बेलवडी येथील मलम्मा देसाई यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना न्याय दिला. सर्व समाजघटकांना रयतेचे राज्य आपले वाटायचे. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यकर्माचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात,  व्याख्यानात झालेल्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. त्यांनी महटले की, व्याख्यानात  छान ज्ञान मिळाले. 

 जयंती समारंभातून आपण काही गुण घेतले पाहीजेत, असे आव्हान उपस्थित विद्यार्थ्यांना केले.  16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली. शिवचरित्रातुन मातेचे प्रेम,वडिला विषयी आदर व्यक्त झाले आहे. निर्धार, निग्रह आदु गुण जोपासले पाहिजेत. आजच्या  पिढीने आईवडिलांचा सन्मान जपला पाहिजे. कार्य नियोजन समजून घेतले पाहिजे. सह्याद्रीचा अभ्यास करून त्यानुसार त्यांनी  कार्य नियोजित केले होते. आपण संघटन कौशल्य शिकणे व वाढविणे गरजेचे आहे. सर्व जातीजमाती मधील मावळयांंना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. आपण  मानव संसाधन योग्य प्रकारे वापरण्यास शिकले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त विद्यापीठ उपपरिसरात निबंध  स्पर्धा घेण्यात आली. रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थीनी  श्वेता राजमाने  हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक व  जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी गणेश आडे याने तृतीय क्रमांक  प्राप्त केल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. व्यवस्थापन विभागातील प्रा. सचिन बस्सैयै  यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top