धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील जय भवानी शिवजयंती महोत्सव मेन रोड धाराशिव यांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पुतळ्याचे पुजन काँग्रेसचे जेष्ठ नेते विश्वास आप्पा शिंदे,बारा बलुतेदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष धनंजय नाना शिंगाडे व भारतीय जनता पक्षाचे नेते दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार व पुजन करण्यात आले.

याप्रसंगी शिवभक्तांना अल्पउपहार व थंड मठ्ठा आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे,राजसिंह राजेनिंबाळकर,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,नाभिक महामंडळाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,अविनाश पाटील,कुणाल निंबाळकर, दादासाहेब घोडके,मंगेश निंबाळकर,सतिश कदम, धनंजय राऊत, नंदकुमार माने, अभिजित बुलबुले,शुभम कदम,रोहन माने,शंकर राठोड,स्वरूप स्वामी,शेखर पुरी, यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top