धाराशिव (प्रतिनिधी)-सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे सर्व पाहुण्यांचे हस्ते पूजन करण्यात आले.  यानंतर छत्रपती शिवाजी महाराजच्या जीवन चरित्रावर आयोजित केलेल्या भाषण स्पर्धेत लहान व मोठ्या गटातून प्रथम, द्वितीय, व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे भाषण संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या भाषणाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर, गटशिक्षण अधिकारी सय्यद व मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावर आपले विचार व्यक्त केले. तसेच पालक सभेसाठी उपस्थित महिला पालकाचा व विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी धाराशिव तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय सय्यद आसरार अहेमद, येडशी बीटचे विस्तार अधिकारी पारवे, शिक्षण विस्तार अधिकारी तथा कस्ट्राईब संघटनेचे जिल्हध्यक्ष बापू शिंदे, केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख राठोड, धाराशिव केंद्र प्रमुख खामरोद्दीन सय्यद साहेव, आळणी  गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्याम बापू लावंड, धाराशिव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदीप वीर, उपसरपंच कृष्णा गाडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार नांदे, विनोद लावंड, माजी सरपंच संतोष चौगुले, रमाकांत लावंड, अक्षय कदम, कदम, विकास पाटील, विनोद वीर, रामराजे वीर,अजय वीर, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बशीर तांबोळी व गावातील सर्व मान्यवर, अनेक महिला पालक व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती सत्यशीला म्हेत्रे  यांनी व आभार श्रीमती क्रांती मते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश पेठे, उत्तम काळे, हनुमंत माने, श्रीमती वर्षा डोंगरे, श्रीमती राधाबाई वीर, श्रीमती मंजुषा नरवटे, श्रीमती सुलक्षणा ढगे यांनी परिश्रम घेतले.


 
Top