भूम (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार आज सकल मराठा समाजाच्या वतीने भूम शहरात आयोजित करण्यात आला होता. रास्ता रोखून आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हणून अगोदर आरक्षण नंतर लग्न असे म्हणून चक्क नवरदेवाने लग्न सोहळा सोडून आंदोलनात सहभाग नोंदवला.

आज सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात शहरातील आयटीआय चौक, प्रतीक पेट्रोल पंप चौक, राजमाता जिजाऊ चौक या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज लग्न मुहूर्त असल्याने भूम येथील  प्रतिकसिह पाटील या नवरदेवाने लग्न सोडून राष्ट्रमाता जिजाऊ चौकातील आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी सदर नवरदेवाने आरक्षण व सगेसोयरे अध्यादेश तात्काळ काढावा व मराठा समाजातील तरुणांना न्याय द्यावा अशी मागणी केली. या रास्ता रोकोमुळे वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.



 
Top