धाराशिव (प्रतिनिधी)-उध्दव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान खासदारांनी साधे एक पत्र केंद्राला देवून विकास निधी मागितला नाही. ना राज्य सरकारकडून जिल्ह्याच्या विकासासाठी काही आणले नाही. केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धाराशिव शहराच्या विकासासाठी 174 कोटी रूपये दिले. हे अतिशय अभिमानास्पद बाब आहे. असे असताना विद्यमान खासदार यांनी शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी त्याच कार्यक्रमाचे परत एकदा भूमीपूजन करून केंद्रीय मंत्री गडकरी यांचा अपमान केला. तर शासकीय कार्यक्रमास वेगळे वळण दिले. याचा आम्ही निषेध करतो. असे मत भाजपाचे लोकसभा संयोजक नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

पुढे बोलताना नितीन काळे यांनी गडकरी यांच्या ऑनलाईन कार्यक्रमात भाजपचे झेंडे कुठेही लावले नव्हते. किंवा भाजपाचा कार्यक्रम आहे असे आम्ही दाखविले नाही. व्यासपीठावर खासदार, आमदार यांच्या नावाच्या खुर्च्या होत्या. असे असताना खासदार फिरकले नाहीत. गेल्या पाच वर्षात खासदारांनी काय विकास कामे केली याचा लेखाजोगा जनतेसमोर ठेवावा असे आवाहन करून नितीन काळे यांनी साधे पत्र देवून निधी येत नसतो. त्यांचा वारवांर पाठपुरावा करावा लागतो. आमच्या पाठपुराव्यामुळेच 174 कोटी रूपयांचा निधी मिळाला असेही नितीन काळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, रामदास कोळगे, ॲड. खंडेराव चौरे, आण्णा पवार, प्रविण पाठक, इंद्रजित देवकते, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे आदी उपस्थित होते. 


 
Top