तुळजापूर (प्रतिनिधी)-.सकल मराठा समाजाने येथील जुन्या बसस्थानक चौकात मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार  शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30ते 12.30 या कालावधीत एक तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची बारावी परिक्षाथींना ञास होवु नये याची दखल घेत मराठा समाजाने शांततेत आंदोलन, करुन प्रशासनाला मागणीचे निवेदन दिले.

यावेळी आंदोलकांन समोर बोलताना सकल मराठा समाजाचे नेते म्हणाले कि, सरकारने सगे-सोयरे बाबत अधिसुचना काढुनही अंमलबजावणी न केल्याने मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा आरक्षण संदर्भात सगे-सोयरेंची अंमलबजावणीसाठी

रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी सकल मराठा समाजाला जाहिर आवाहन केलेले होते. त्या आदेशाचे पालन करीत हे रस्ता रोको आंदोलन केल्याचे स्पष्ट करुन,  सरकारने तात्काळ सगे-सोयरेच्या अधिसुचनेची अंमलबजावणी करावी. अन्यथा मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार येथुन पुढील आंदोलन तीव्र होतील याची प्रशासनाने दखल घ्यावी असा इशारा यावेळी दिला.

या निवेदनावर  अँड. धिरज पाटील, अजय सांळुके, महेश गवळी, अण्णासाहेब क्षिरसागर, कुमार टोले,  प्रशांत सोंजी, अर्जून सांळुके, आबा कापसे, बालाजी जाधव, जीवनराजे इंगळे, निखील अमृतराव, सत्यजीत साठे, उमाकांत साळवे, विशाल सांळुके, तेजेस बोबडे, अक्षय साळवे, केतन मलबा, गणेश नन्नवरे, गोपाळ गंधोरे, शाम पवार, अमोल कुतवळ, संदीप गंगणे, दिपक हंगरगेकर, अनिल हंगरगेकर, आकाश डावकरे यांच्या सह्या आहेत. या आंदोलनात शेकडो मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


 
Top