भूम (प्रतिनिधी)- इंटरमिजिएट श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम केंद्राचा निकाल 100% लागला आहे. श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम ता. भूम जि. धाराशिव या केंद्रातून 7 शाळेतील 211 विद्यार्थ्यां परीक्षेत बसले होते. त्यामध्ये केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. 

श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम या शाळेतून परीक्षेला एकूण 114 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ए ग्रेडमध्ये 16 विद्यार्थी, बी ग्रेडमध्ये 45 विद्यार्थी आणि सी ग्रेड मध्ये 55 विद्यार्थी असे एकूण 114 विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे, संस्थेचे सचिव सतिश देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव, व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्यांना कला विभाग राजाराम कोळी व राजू साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


 
Top