धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20-20 ने येत्या पाच सहा वर्षात अमुलाग्र बदल होणार असून प्रत्येकालाच त्याला सामोरे जावे लागणार आहे. असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात  ऑनलाइन आयोजित केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या कार्यशाळेच्या वेळी  महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड चे जनरल मॅनेजर अतुल पाटोदी यांनी केले.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने ,कार्यशाळा समन्वयक डॉ.सुशीलकुमार होळंबे ,प्रा एस.जी.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पुढे बोलताना अतुल पाटोदी म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे एका रात्रीत बदलणारे धोरण नसून त्यासाठी वेळ लागणार आहे. आपण जे शिकतोय ते समाजापर्यंत कसे पोहोचवता येईल यावर या धोरणामध्ये भर देणार असून, रोजगाराभिमुख शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा यामध्ये प्रयत्न असतील. तसेच इंडस्ट्रियल रेव्होल्युशन पाच मधून आपण जात असून सध्या 90%  डिजिटल स्किल आपल्याला आत्मसात करावे लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये लर्न, अनलर्न आणि रीलर्न या प्रिन्सिपल चा वापर करावा लागणार आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सुरू असलेली सेमिस्टर पद्धती सर्वच प्रकारच्या पदवी मध्ये यापुढे सुरू राहील.या शैक्षणिक धोरणातील मुख्य बदल म्हणजे आता चॉईस बेस शिक्षण असल्यामुळे आपल्याला मुख्य विषयासोबत बाकी विषयांचा सुद्धा आवडीनुसार अभ्यास करता येईल .

या वर्कशॉपच्या प्रास्ताविक पर भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की आम्ही  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीपासूनच रोजगाराभिमुख  कौशल्यावर आधारित कोर्सेस शिकवत असून महाविद्यालयामध्ये सिस्को अकॅडमी, रिमोट पायलट ट्रेनिंग ड्रोन ऑर्गनायझेशन, रेडिओ तेरणा 90.4 सेंटर व ड्रायव्हिंग सेंटर यासारखे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास होण्यासाठी स्वतंत्र कक्ष असल्यामुळे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे चार हजाराहून जास्त सर्टिफिकेशन कोर्सस पूर्ण केले असून येणाऱ्या काळात ही  इंडस्ट्रीला लागणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी नुसार नवीन कोर्सेस महाविद्यालयामध्ये राबविलेले जाणार आहेत. त्यामुळेच आमच्या विद्यार्थ्याच्या प्लेसमेंटचे प्रमाण हे 90% पर्यंत पोहोचलेले आहे. आमचे दहा हजारापेक्षा अधिक विद्यार्थी हे देशातच नाही तर देश विदेशात उच्च पदावर सध्या कार्यरत आहे  व हजारो विद्यार्थ्यांचे स्वतंत्र स्टार्टअप आहेत.याचा आम्हाला अभिमान वाटतो .नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणखीन याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, त्या दृष्टीने आम्ही तयार आहोत. या कार्यशाळेसाठी संपूर्ण भारतामधून 200 पेक्षा जास्त पार्टीसिपेंट सहभागी झाले होते. त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नावर यावेळी तज्ञ पाटोदी यांनी उत्तर देऊन त्यांच्या शंकेचे निरसन केले. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुशीलकुमार होळंबे यांनी उपस्थिताचे आभार मानले.


 
Top