धाराशिव (प्रतिनिधी)- मांजरा परिवारात नुकताच समाविष्ट झालेला व तुळजापूर,धाराशिव,लोहारा व औसा परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या जीवनात आर्थिक उन्नती साठी वरदान ठरत आहे. मांजरा शुगर इंडस्ट्रीजने (कंचेश्वर) चालू गळीत हंगाम 2023-24 मध्ये गाळप क्षमतेचा पुरेपूर वापर करत ऊस उत्पादक शेतक-यांचा ऊस तत्परतेने गाळप व्हावा यासाठी योग्य ते नियोजन केले व त्यानुसार कारखान्याच्या सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.

चालू गळीत हंगामात कारखान्याने दि. 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 3,45,240 मेट्रीक टन एवढे गाळप केले आहे. तर 3,59,950 क्विंटल एवढे साखरेचे उत्पादन केले आहे.

दि.10 फेब्रुवारी 2024 पर्यंत गाळप झालेल्या ऊसाला कारखान्याकडून पहिला हप्ता रू. 2,600 प्रती मेट्रिक टना प्रमाणे दिला असून त्या पोटी कारखान्याने रक्कम रु. 85.18 कोटी एवढी रक्कम  संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात शिल्लक असलेल्या ऊसाचे संपूर्ण गाळप करण्यासाठी कारखाना तत्पर असल्याचे कारखान्याचे व्यवस्थापक यांनी कळवले असून ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस गाळपासाठी मांजरा शुगर इंडस्ट्रीज(कंचेश्वर)कडे द्यावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापक सतीश वाकडे यांनी केले आहे.



 
Top