उमरगा (प्रतिनिधी)-भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्यावतीने शहरात मातारमाई आंबेडकर यांचा जन्मोत्सव गुरुवारी विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.तालुक्यात तीन गावात महिला उपासिका शिबिर घेण्यात आले.

प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास व माता रमाईच्या प्रतिमेला भंत्ने सुमंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे,प्रदेश काँग्रेसचे दिलीप भालेराव,बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत कांबळे,वंचीतचें रामभाऊ गायकवाड,रिपाइंचे नेते हरिष डावरे, एस.के. चेले,श्रीधर सरपे,मच्छिंद्र सरपे, ॲड. हिराजी पांढरे, ॲड. मल्हारी बनसोंडे,प्रा एस.आर.वाघमारे आदींची उपस्थिती होती.

पंचायत समितीच्या मैदानावर दुपारी जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले.या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक बापूसाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी विजयमाला धावरे या होत्या तर प्रमुख उपस्थिती मध्ये महीला संघटक शारदा गजभिये, परंडा महाविहार अध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे,राजश्री कदम माधवराव ढोणे, बापू ढोणे,विश्वास पांडागळे,चंद्रकांत कांबळे आदींची उपस्थिती होती.

सायंकाळी शहरातील हुतात्मा स्मारका पासून रमाईच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत लेझीम पथकाच्या कलाकारांनी मनमोहन लेझिमचा खेळ सादर केला.कार्यक्रमास तुगाव,औराद,कोरेगाव,कुन्हाळी,आलुर, तुरोरी,सांगवी,येणेगुर,एकुरगा, तलमोड येथून महिलां पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.समता सैनिक , तसेच समता नगर,पंचशील नगर येथील महिला उपासिकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमासाठी बौद्ध महासभेचे तालुकाअध्यक्ष संतोष सुरवसे,जीवन सुरवसे,राजेंद्र सूर्यवंशी, अविनाश भालेराव,संजय कांबळे,दिलीप गायकवाड,स्वाती गायकवाड,प्रभाकर गायकवाड,दयानंद कांबळे,किरण कांबळे,आनंद कांबळे,संगीता सोनकांबळे,राजाबाई झाकडे, दिलीप सुरवसे सुभाष काळे,बालाजी गायकवाड,शुभांगी गायकवाड,लताताई कोल्हे,संगीता गायकवाड,शिवानंद भंडारे,कमलाकर कांबळे,आदींनी परिश्रम घेतले.


पंचशील नगर येथे अभिवादन

शहरातील कुंभारपटी येथील विहारात माता रमाई जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अडँ शिल्पा सुरवसे होत्या अडँ सुरवसे यांनी महिलांना रमाईच्या जयंतीनिमित्त उपदेश केला आपल्यातील अंधश्रद्धा, कर्मकांड, जुन्या चालीरीती बंद करून मुलांना शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे त्या म्हणाल्या. या वेळी महिला मंडळाच्या अंजनाबाई भालेराव, केशर व्हताळकर,अनुसया कांबळे, फुलाबाई मन्नाडे, महादेवी गायकवाड, रेणुका सूर्यवंशी, सुवर्णा भालेराव, मनीषा कांबळे आदींनी परिश्रम घेतले.प्रस्तावित कवी गुणरत्न भालेराव यांनी केले सूत्रसंचालन शंकर कांबळे यांनी केले तर धीरज कांबळे यांनी आभार मानले.


 
Top