परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील भोंजा हवेली येथे बुधवार दि.7 रोजी शेवटच्या क्षणापर्यंत कठीण काळात भक्कम साथ देऊन वंचित घटकांच्या जीवनोत्थानासाठी कार्य करून पाठबळ देणारी शक्ती म्हणजे माता रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

डॉ.बाबासाहेबांच्या कार्य यशस्वितेसाठी रमाबाईंनी स्वतः पत्करलेला त्याग आणि त्यांनी दिलेला संघर्ष कायम प्रेरणा स्मरणात राहील माता रमाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांना भोंजा हवेली येथील नागरिकांनी  अभिवादन केले. यावेळी पंचशील तरूण मंडळाचे अध्यक्ष देविदास सरवदे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, मोहन आबा थोरात, उपाध्यक्ष अनिकेत कांबळे, हनुमंत सावंत, आण्णा सरवदे, दया सरवदे, भैय्या पोळके, प्रमोद सरवदे, जिथ थोरात, अक्षय थोरात, राजाभाऊ सरवदे  आदी उपस्थित होते.


 
Top