धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी यांच्या वतीने शेतकरी अनुदान, पिक विमा कर्ज खात्यात वर्ग न करणे बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात भेटून सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात यंदा कमी पर्जन्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्यातील महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, सरकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत व वीज कनेक्शन न तोडणे. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स अशा सवलती दुष्काळग्रस्तांना देण्यात याव्या अशा प्रकारचा शासन निर्णय झाला आहे.  काही बँका शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा, अनुदान अशा रकमा कर्ज खात्यात जमा करीत असल्याच्या अनेक तक्रारी पक्षाकडे येत आहेत तरी या नैसर्गिक आपत्तीच्या काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचा तगादा करू नये आणि त्यांना पीक विमा आणि अनुदानाच्या स्वरूपात बँक खात्यात जमा होणारी रक्कम संपूर्णपणे शेतकऱ्यांना मिळावी याबाबत जिल्ह्यातील सर्व बँकांना आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना आपल्या स्तरावरून उचित निर्देश द्यावेत असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र  धूरगुडे, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, पदवीधर विभाग प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, जिल्हा सरचिटणीस महेश नलावडे, जगदीश पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, माजी नगरसेवक भागवतराव कवडे,धर्मराज गटकळ,दादा बारस्कर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top