उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील बलसूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री यल्लालींग महाराज यांची 38 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. दोन दिवसापासून सुरु असलेल्या या कार्यक्रमात धनगर समाजातील पारंपारिक ढोलांचा कार्यक्रम, भजन, कीर्तन असे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच बुधवारी गावातून श्री यल्लालींग महाराजांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणुक काढण्यात आल.

यामध्ये बलसूर, देवळाली,कर्नाटकातील मन्नाळी येथील धनगर समाजातील पारंपारिक ढोल पथकांचा सहभाग होता ते या मिरवणूकीचे आकर्षण ठरले तसेच या मिरवनुकीत महिला, युवकांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती श्री यल्लालींग महाराजांच्या जयघोषाने बलसुर नगरी दुमदुमली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्जुन बनसोडे ज्ञानेश्वर दुधभाते,दत्तु बनसोडे,शाहुराज घोडके,शिवराम घोडके,आनंद घोडके, राहुल बनसोडे,मनोज बनसोडे,भिमा बनसोडे, गोविंद वाघमोडे,महेश सुरवसे, मनोज बनसोडे, अमोल वाघमोडे, व्यंकट वाघमोडे ,गोपाळ वाघमोडे, मनोहर सुरवसे, भिमा बनसोडे, शाहुराज बनसोडे, रावण बनसोडे यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.


 
Top