भूम(प्रतिनिधी)-सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या,नॅशनल सायन्स ऑलंपियाड परीक्षेत रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळाले आहे. या परिक्षेत गायकवाड श्रीजा राहुल, बळे संजना अमोल, मुंजाळ मयुरी मनोज हे विद्यार्थी गोल्ड मेडल मिळवून जिल्हास्तरीय द्वितीय परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. कांबळे उत्कर्ष बाळासाहेब,मोहिते आरोही बाळू,काळे सायली विशाल,वाळके वैष्णवी दत्तात्रय. या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक भालेकर व मद्देवाड यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक गाडे, उपमुख्याध्यापिका श्रीमती पाटील, पर्यवेक्षक लगाडे तसेच पवार, लोकरे, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक देशमुख तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.