धाराशिव (प्रतिनिधी)-मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता भव्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भव्य किल्ला सजावट, भवानी माता पूजन व एलईडी लेझर लाइटिंग डेकोरेशनचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाराणसीहून आलेल्या पुजाऱ्यांनी भवानी मातेची आरती केली.

यावेळी माजी राज्यमंत्री तथा धाराशिव तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,शिवसेना सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताण्णा साळुंके, मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक प्रकाश जगताप, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सतीश दंडनाईक यांचेसह मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व शिवभक्त तसेच धाराशिव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top