धाराशिव दि.13 (प्रतिनिधी) - संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष, संत सेवालाल महाराजांची जयंती व पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निमंत्रित कवींच्या विद्रोही कवितांचा एल्गार अर्थात भीम विचारांचा जागर या प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन दि.15 रोजी करण्यात आले आहे. दरम्यान, कवयित्री भाग्यश्री केसकर यांना नुकताच नामदेव ढसाळ व डॉ यशवंत मनोहर पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.

धाराशिव शहरातील रमाई फाउंडेशनच्यावतीने विद्रोही कवींच्या कवितांचा एल्गार अर्थात भीम विचारांचा जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर येथील विद्रोही ज्येष्ठ साहित्यिक भरत यादव व समर्थ सिटीचे उद्योजक सचिन शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील ज्येष्ठ कवी डॉ केशव खटींग, छ संभाजीनगर येथील नारायण पुरी, दंगलकार नितीन चंदनशिवे, रवी केसकर, डी.के. शेख, पंडित कांबळे, प्रभाकर बनसोडे, विजय गायकवाड, दिलीप गायकवाड आदींसह आदी उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन धाराशिव शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.50 वाजता करण्यात आले आहे. या काव्य संमेलनाची संकल्पना उत्कर्षा वाघमारे -चिलवंत व छत्रपाल वाघमारे यांची आहे. तर व्यवस्थापन अमरशक्ती चिलवंत, राहुल वाघमारे, रोहित शिंगाडे, नितीन लांडगे आदीसह इतर करीत आहेत. अधिक माहितीसाठी मो.नं.- 9923517120 व 8421885705 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच या काव्य संमेलनासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत यांनी केले आहे.


 
Top