धाराशिव (प्रतिनिधी)-उच्च न्यायालय कर्मचारी को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी, मुंबईच्या अध्यक्षपदी धाराशिव येथील सनी सुरेंद्र हौसलमल यांची निवड करण्यात आली आहे.

शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सनी सुरेंद्र हौसलमल हे बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांच्या संस्थेच्या सर्व सभासदांच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी निवडीबद्दल सत्कार केला. सनी सुरेंद्र हौसलमल हे धाराशिव येथील रहिवाशी आहेत. उच्च न्यायालयीन कर्मचारी को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची स्थापना 19 जानेवारी 1931 साली झाली आहे.  सध्या संस्थेचे एकूण दोन हजार 400 सभासद आहेत. संस्थेला ऑडीट वर्ग-अ दर्जा आहे. उच्च न्यायालय को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीमध्ये मुंबई उच्च न्यायालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, विशेष न्यायालय, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई शेरीफ ऑफिस, सरकारी वकील कार्यालये, लवाद न्यायाधिकरणच्या कर्मचारी सभासदांचा समावेश आहे.


 
Top