तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने श्री शिवछत्रपती सार्वजनिक शिवमहोत्सव सोहळा समितीच्या वतीने 18 फेब्रुवारीला ग्रामीण रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबीरात 158 रक्तदात्यानी रक्तदान केले.

शिबिराचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालयातील डॉ.विजय विश्वकर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. रक्तदान शिबीरासाठी किरण फंड, गणेश चौगुले, गणेश देशमुख, अभिजित मुळे, सोमनाथ आबदारे, राजेश आंबड , गणेश आबदारे, अशोक फंड,मंगेश माने, सुजित नाईकवाडी,पांडुरंग मुळे, सुधीर मोरे, संजय जाधव,अमोल थोडसरे,सचिन मुळे, काका काळे,दिपक नाईकवाडी,आकाश मुंडे,प्रविण फंड,सागर थोडसरे, मयुर चौगुले,गणेश मुळे,संतोष थोडसरे , धाराशिव येथील रेणुका ब्लड सेंटरच्या कर्मचारी व युवकानी परिश्रम घेतले.

 

 
Top