धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ.व्ही.के.पाटील शैक्षणिक संकुलामधील एस.पी.पॉलिटेक्निक कॉलेज आणि डॉ. व्ही.के. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँन्ड टेक्नोलॉजी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहने साजरा करण्यात आली. तसेच जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे म्हणुन डी.व बी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले. तर आभार प्रदर्शन एस.पी.पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमर कवडे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.


 
Top