धाराशिव (प्रतिनिधी)-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका न घेता कायमस्वरुपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.26) पुकारलेल्या बंद आंदोलनाला बाजार समित्या बंद ठेवून व्यापारी, शेतकरी, हमाल मापाडी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.

या आंदोलनात जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, मुरुम, लोहारा, परंडा, भूम, कळंब, वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता   कायमस्वपरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला व्यापारी, हमाल माथाडी कामगार, शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिली.


 
Top