धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे खंडोबा मंदिरात श्री खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्त शनिवारी (दि. 24) व रविवारी (दि. 25) विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते लिंबा वाघे यांच्या स्मरणार्थ मूर्ती देण्यात आली आहे. यानिमित्त वारकरी संप्रदायाच्या वतीने व ग्रामस्थांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर मूर्ती प्रतिष्ठापनेच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. याच कार्यक्रमात ज्येष्ठ कीर्तनकार मोहन आप्पा वाघुलकर यांच्या पासष्ठीनिमित्त जिल्ह्यातील वारकरी, सामाजिक, धार्मिक, पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी संदिपान महाराज हासेगावकर यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार होईल. कार्यक्रमात डॉ.  अविनाश गावडे, डॉ.  सचिन ताडेकर, डॉ. श्रीनिवास पवार यांच्या पुढाकारातून मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. रविवारी मूर्ती जलपूजन व होम हवनाचा कार्यक्रम होईल. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीहरी चौरे महाराज, उपाध्यक्ष दिलीप गरड महाराज, कोषाध्यक्ष विलास पिंगळे महाराज आदींची उपस्थिती असणार आहे.


 
Top